दररोज वापरली जाणारी इंग्रजी वाक्ये शिकणे म्हणजे इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास वाढवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. जर तुम्ही रोज थोडा सराव केला, तर तुम्ही सहज इंग्रजी बोलू शकता. आज आपण काही खूप उपयुक्त Daily Use English Sentences मराठी अर्थासह शिकणार आहोत.
1. कुठे जाणे आणि सोबत येणे
तू कुठे चालला आहेस?
Where are you going?
मी दुकानात चाललो आहे.
I am going to the shop.
मी तुझ्यासोबत येऊ का?
Can I come with you?
हो, माझ्यासोबत ये.
Yes, come with me.
चल, आपण सोबत जाऊया.
Let’s go together.
2. खरेदी आणि पैसे यावर वाक्ये
तुला काय घ्यायचं आहे?
What do you want to buy?
मला काही खायला घ्यायचं आहे.
I want to buy something to eat.
तुझ्याकडे पैसे आहेत का?
Do you have money?
हो, माझ्याकडे थोडे पैसे आहेत.
Yes, I have some money.
ही दुकान खूप छान आहे.
This shop is very nice.
3. समजणे आणि बोलणे
तुम्ही काय म्हणत आहात मला समजतंय.
I understand what you are saying.
बोलण्याची काय गरज होती?
What was the need to speak?
मी तुला हे कसं समजावून सांगू?
How do I explain this to you?
4. वेळ आणि वाट पाहणे
तुम्ही कधीपासून वाट पाहत आहात?
Since when have you been waiting?
मी तुझी वाट पाहत होतो.
I was waiting for you.
तू आजही उशिरा आलास.
You came late again today.
5. रोजच्या संभाषणातील सोपी वाक्ये
तू काय करत आहेस?
What are you doing?
ती खूप सुंदर आहे.
She is very beautiful.
मी तुला काल भेटलो.
I met you yesterday.
आपण आता जाऊया.
We should go now.
तुला चहा आवडतो का?
Do you like tea?
तो माझा मित्र आहे.
He is my friend.
ती शाळेत जाते.
She goes to school.
आपण उद्या भेटूया.
We will meet tomorrow.
मला इंग्रजी शिकायचं आहे.
I want to learn English.
Sentence Practice Tips | सराव कसा करावा?
1. मोठ्याने वाचा
प्रत्येक वाक्य मोठ्याने 5 वेळा बोला.
2. स्वतःचे उदाहरण तयार करा
उदा.
- I want to buy a book.
- I want to buy a pen.
3. दररोज वापरा
घरात, मित्रांसोबत किंवा स्वतःशी इंग्रजीत बोलण्याचा प्रयत्न करा.
4. Translation Practice करा
मराठीतून इंग्रजी आणि इंग्रजीतून मराठीत भाषांतर करा.
छोटासा सराव
मराठीतून इंग्रजीत भाषांतर करा:
- तू कुठे चालला आहेस?
- मला चहा आवडतो.
- आपण उद्या भेटूया.
- तू काय करत आहेस?
- मी तुझी वाट पाहत होतो.
Conclusion
दररोज अशा छोट्या वाक्यांचा सराव केल्याने तुमची इंग्रजी खूप सुधारेल. सुरुवातीला चुका झाल्या तरी हरकत नाही. सातत्याने सराव करा आणि आत्मविश्वासाने बोला.
तुम्हाला अजून Daily Use English Sentences शिकायच्या असतील, तर रोज सराव करत राहा. 😊
